भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार -
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महू या गावी 14 एप्रिल 1899 रोजी झाला .
भिमराव रामजी आंबेडकर हे त्यांचे पूर्ण नाव होते. बालपणापासूनच वडिलांनी भिमरावांना चांगली पुस्तके वाचण्याचा छंद लावला.
व्यायामाने जसे शरीर घडते तसे वाचनाने मस्तक सुधारते हे भिमरावांच्या अंगी रामजींनी पुरेपूर उतरवले. त्यांचे ग्रंथ वाचनाचे वेड अजब होते. ते ग्रंथालयात ग्रंथ वाचण्यासाठी सर्वात अगोदर जात व सर्वात शेवटी बाहेर पडत.
"शिक्षण हे समाज परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे"
हे डॉ . बाबासाहेबांनी मनोमन ओळखून समाजाला नवदिशा दिली. लहानपणापासून भिमराव अत्यंत हुशार विद्यार्थी होते.त्याकाळी अस्पृश्यतेचे विषारी पीक समजतात आपली मुळे घट्ट रोवून डौलाने डोलत होते . त्यास मुळापासून उखडून टाकण्याचा पक्का निर्धार करून डॉ बाबासाहेबांनी संघर्ष करण्याचे ठरवले...
त्यांनी जनतेला आवाहन केले . शिका, संघटित व्हा संघर्ष करा हा मोलाचा संदेश त्यांनी समाज बांधवांना दिला. स्त्रीयांच्या, गोरगरिबांच्या जीवनात चैतन्याची नवी पहाट आणण्याचे डॉ बाबासाहेबांनी ठरवले.
त्यांनी मॅट्रिक , बीए , एमए , पीएचडी अशा अनेक पदव्या घेत डी. लिट. पदवी संपादन केली .
अनेक भाषांवर त्यांनी उत्तम प्रभुत्व मिळवले.
डॉ .बाबासाहेबांची भाषा चिंतनशील, अभ्यासपूर्ण गहन होती. डॉ .बाबासाहेब आंबेडकर परिस्तिथीने श्रीमंत नसले तरी त्यांच्या विचारांनी मात्र ते गर्भ श्रीमंत होते . अनेक पाक्षिके , ग्रंथ , वृत्तपत्र यांचे प्रभावी संपादान करून समाज्याच्या प्रश्नांना त्यांनी प्रखर वाचा फोडली.
भारत देशाला उत्तम राज्यघटना प्रदान करण्याचे अजोड कार्य बाबासाहेबांनी केले.
डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते.
त्यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह करून समग्रविश्वासाठी तळे खुले केले. जनतेची तहान भागवण्याचे महान, मोलाचे कार्य बाबासाहेबांनी केले.
अश्या या महामानवाने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. आजच्या प्रत्तेक विद्यार्थ्याने जनतेचे कैवारी डॉ .बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घेतले तर नक्कीच भारताचा भावी नागरीक उत्कृष्ट,प्रेरक,आदर्श ठरेल यात शंकाच नाही.
" जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका .
या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे.
अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे...
"
लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात
।। डॉ. बाबासाहेब आंबेडकर ।।

Nice ��
ReplyDeleteMast
ReplyDeleteKeep it Up...