Tuesday, 5 May 2020

सलाम त्या वीरपत्नीला शहिद पतीसाठी केला देशसेवेचा निर्धार ....


          महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक...

   देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहेत. नियतीच्या आघाताने खचून जाणे , हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण ; परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार, आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांचा पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या विरंगणेचा हा परिचय तुम्हांला निश्चितच प्रेरक ठरेल. 
     
  महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा, 'भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना' असा प्रवास अत्यंत धाडसी , प्रेरक आणि थक्क करणारा आहे. 
।।स्वाती संतोष महाडिक।।
     शिवाजी विद्यापीठातून बी. एससी व एम. एस. डब्ल्यु अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्ने पाहिली होती . दरम्यानच्या  काळात  त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री. संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी बी. एड आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. साडेबारा वर्षांच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची दोन अपत्ये.  कर्नल संतोष महाडीक यांचे पाहिले प्रेम म्हणजे 'भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. '  याची जाणीव स्वाती महाडीक यांनाही होतीच. भारतीय सैन्यदलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता. आणि अचानक...17 नोव्हेम्बर , 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालीयनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवादी यांबरोबर निकराने लढा देताना वीरमरण आले. 
       नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या  चाळीशीच्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चय पूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अँकॅडमी , चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी अकरा महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे दोन स्टार मिळवले . त्या वेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही सातवीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता दुसरीत शिकत होता. या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर  खचून न जाता सैन्यदलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोरच नव्हे , तर देशातील प्रत्येक स्त्री , प्रत्येक मूल यांच्या समोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. त्याबद्द्ल त्यांचे आईवडील, सासरचे मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. "स्वाती लहानपासूनच धाडसी  होती",असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षणक्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी , अनेक  सुखासीन आयुष्य देऊ केले होते ; परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैण्यात भरती होऊन, पतीचे ' पाहिले प्रेम ' जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या  ' दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार ! ' हा स्वतीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे, जिद्दीचे मूर्त रूप आहे.
       खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वातीचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही. उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधन ठरले. अन्यथा या वेदनेतून बाहेर येने कठीण होते , असे  त्या म्हणतात .
       मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्वाचे वाटते , कारण त्यांच्या मते , एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते . जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. स्वाती महाडिक म्हणतात, "आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे". "तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्वाचे आहे". निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे.  
       आपण जे काम करतो, मग ते कोणतेही असो, त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं , अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाचे असते , असे त्या म्हणतात. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक    मुलींना व स्त्रीयांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात . 
      पतिनिधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरंगणेला सादर प्रणाम !  
       

Monday, 4 May 2020

AN INSPIRING WOMEN OF INDIA: ARUNIMA SINHA....!


  • पहली विकलांग महिला माऊंट एवरेस्ट फतह करने वाली अरुणिमा सिन्हा।                               
  • जिद्ध,चिकाटी,दुर्दम्य ,महत्वाकांक्षा,प्रयत्नवाद याचे मूर्तीवंत उदाहरण म्हणजे 'अरुणीमा ' ! अपघातामुळे अपंगत्व  आलेल्या अरुणीमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली . 'एव्हरेस्ट गाठणे' हे भल्याभल्यांचे स्वप्न असतात; पण सकारात्मक दृष्टीने अरुणीमाने हे स्वप्न सत्यात उतरवले . अरुणीमाला स्वतावर आलेल्या संकटात गमवाव्या लागणाऱ्या पायांसाठी सहानुभूतीची अपेक्षा करतांना दिसत नाही , तर प्रतिकूल परिस्तितीवर मात करुन ध्येय गाठण्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवते , किंबहुना आपल्या प्रत्येकात एक 'जिद्दी अरुणिमा' असते 
Arunima sinha
   ।।तुमच्यातल्या अरूनीमाचा शोध घ्या ।। 

ध्येय साध्य करताना आलेली निष्पळता म्हणजे अपयश नव्हे तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश, हे कायम लक्षात ठेवा असे अरुणिमा सांगते .
 अरुणिमा सिन्हा!  आज तुम्ही गूगलवर शोधले तर  'Mount Everest सर करणारी पहिली अपंग भारतीय महिला असा उल्लेख जिचा  दिसतो तीच ही अरुणिमा'.
  पण खर तर ती काही जन्मताच अपंग वैगरे नव्हती . तीची  धडधाकट असल्या पासूनची गोष्ट बघा ।
  लखनऊपासून 200 किमी अंतरावर असणार आंबेडकर नगर हे तीच गाव . घरी ती , तिची आई आणि तिचा लहान भाऊ . मोठ्या बहिणीच लग्न झालेलं . तिचे वडील ती लहान असतानाच देवाघरी गेलेत. आता भाईसाब( मोठ्या बहिणीचे पती ) हेच काय ते त्यांच्या कुटुंबातले महत्वाचे निर्णय घेणारे . खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात ती जन्मली हे तिचे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर 'आता CISF  ची नोकरी मिळते का बघ , म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील', हा भाईसाहबनी दिलेला सल्ला तिने शिरोधार्य मानला त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि 'कॉल लेटर' आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी तिची जन्मतारीखच चुकलेली होती . हा घोळ निस्तारण्यासाठी तीला दिल्लीला जाणे भाग होते.

11एप्रिल , 2011चा तो दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीने फुललेल .पद्मावती एक्सप्रेस मध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने तीने कॉर्नर सीट पटकावले . गाडीने वेग घेतला आणि तिचे विचारचक्र सुरू झाले . 'बस....एवढे कागदपत्रांणचे काम  झाले, की झालेच आपले पक्के असा विचार अरुणिमा करत होती' . अचानक तिचे लक्ष वेधून घेतले ते तिला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी . त्यांचे लक्ष तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते ; पण तीही काही कच्च्या गुरुची चेली नव्हती त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून तिने  तिच्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली . आशःचर्य म्हणजे , त्या डब्यातील प्रत्येकजण ' अन्यायाविरुद्ध लढणे हे जणू पाप आहे ' , अश्या चेहऱ्याने मख्खपणे  जागेवरच बसून राहिला . अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला . रात्रीच्या भयाण अंधारात तिचे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमांनी तिला चक्क चालत्या गाडीतुन बाहेर फेकून दिल . शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर ती आढळली आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून ती खाली पडली . 'अरुणिमा , रेल्वे येतेय आणि तुझे पाय बाजूला घे ', हा तिच्या अंतर्मनाचा संदेश मेंदूपर्यंत पोहचेपर्यंत खुप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे तिच्या पायांवरून धडधडत निघून गेली . नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार , तब्बल 49 गाड्या त्या रात्री तिच्या पायावरून गेल्या.... एका पायाच्या गुढग्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झालाच होता ; पण दुसऱ्या पायाचीही दूरवस्था झालेली .  


   त्या रात्री तब्बल सात तास , रेल्वेच्या धावोपट्टीवर मदतीची याचना करत अरुणिमा पडून राहिली . आश्चर्य म्हणजे तिची शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता...सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तेथे आले . हादरलेच ते तिला तश्या आवस्तेत पाहून . त्यांनी तिला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतर .

   बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भुलतज्ञ होता ना तिला देण्यासाठी पुरेसे रक्त. संचित झालेले डॉक्टर व सहकाऱ्यांना तिनेच धीर दिला , 'डॉक्टर , नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल अशी जखमी अरुणिमा बोलली .' मग डॉक्टरांनी तिच्यादेखतच  तिचा पाय कापला .

   पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते . 'फुटबॉल आणि हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली 'ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली . तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी तिला दिल्लीच्या 'एम्स'मध्ये हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्या क्रीडामंत्र्यांनी तिला दिल्लीच्या 'एम्स'मध्ये हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा तिला मिळाल्या ...पण...पण शल्य एकच होत की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. 'अरुणिमकडे  प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतुन खाली उडी मारली ' इथपासून ते'अरुणिमाने आत्महत्तेचा प्रयत्न केला ',इथपर्यंत काहीही छापून येत होत. तब्बल चार  महिने 'एम्स'मध्ये राहिल्यानंतर, शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती ; पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते . ती आणि तिचं ढालीप्रमाण रक्षण करणार  कुटुंब सत्य परिस्थिती ओरडुन सांगत होते ;पण  ती एकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस.
            त्याच दिवशी , हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या   मी निर्धार केला , 'जे आज बोलत आहेत , माझ्याकडे बोट दाखवत आहेत त्यांना बोलु दे ; पण एक दिवस नक्की माझा असेल , जेव्हा ही आरुणिमा एव्हरेस्ट सर करेल !' आरुणिमा म्हणते आपला सर्वांत मोठा मोटिव्हेटर कोण असतो ?  तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आता उठता - बसता , खाता - पिता केवळ आणि केवळ ती एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते.
            पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. 'एम्स'मधून  डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय  कापावा लागलेले पेशंट्स दिवसेंदिवस अगदी महिनोन महिने उठत नाहीत . ती दोनच दिवसात उभी राहिली. एका  पायात घोटःयाची हाडे तुटल्याने रॉड घातलेला , ज्यांच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला . असा तिचा अवतार नि जोडीला भाईसाब पोचले  ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे . बाचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला . त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी तिला ध्येयाचा आदर दिला , तीला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, "अरुणिमा,तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास....तुला ठाऊक आहे , तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुका एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला , जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला....!"
            तिच्या अशा अवस्थेमुळे प्रथम तिच्यासोबत तिचा शेरपा जायला तयारच होईना . साहजिक आहे , जिथे अव्यंग , धडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाहीत तिथे तिची काय कथा ? पण तिच्या घरच्या लोकांनी तिच्या शेरपाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसांची एक रोमांचकारी लढाई!'
            प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी चार बेसकॅम्प्स करावे लागतात. एकदा का तुम्ही 'कॅम्प चार ' ला पोहोचलात ,की तिथून शिखर 3500 फुटांवर आहे; पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात म्हणून याला 'डेथ झोन ' म्हटले जाते . मला तुम्हांला सांगावंस वाटत,की चौथ्या बेसकॅम्पला पोहोचेपर्यंतही आधीच्या कॅम्पसमध्ये ती तिच्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतकी पुढे की लोक विचारत , 'मँडम, हर बार आप हमसे आगे रहते हो! आखीर खाते क्या हो भई?' ती अपंग म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती तिला....कदाचित याच विचारांच प्रतिबिंब तीच्या कृतीतून उमटत होतं...

            'डेथ झोन'ची चढाई सुरू झाली ...जिकडे तिकडे मृत्यूदेहांचाच खच पडलेला , तिला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला...पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला ती आवर घालत होती.'तुला मरायचं नाहीये,अरुणिमा ',अंतर्मनाला वारंवार ती हेच बजावत होती. ती सांगते , आपलं मन जसं सांगत , तसंच, अगदी तसच आपलं शरीर वागत.
            21मे, 2013 ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला . 'अरुणिमा,तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय,आत्ताच मागे फिर...एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील!' शेरपा कळकळीने बजावत होता ; पण अंतर्मनात कुठेतरी तीला ठाऊक होतं की Now or never ! आता अगदी या क्षणी जर तिने एव्हरेस्ट सर केलं नाही , तर तिच्या लेखी तिच्या शरीराने मृत्यूला कवटाळन्यासारखेच होते ना .  शिवाय, पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अखेर ती एव्हरेस्ट शिखरावर पोहोचली...

सलाम त्या वीरपत्नीला शहिद पतीसाठी केला देशसेवेचा निर्धार ....

          महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक...    देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ दे...